नद्या कोरड्याच, जलसंकट कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

बीड - जिल्ह्यात दीड महिन्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. आठ दिवसांत संततधार व रिमझिम पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला; मात्र जलाशयांमध्ये पाण्याची आवकच झाली नाही. रिमझिम पावसामुळे फक्त माजलगाव धरणातच केवळ एक टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. मोठ्या पावसाअभावी जिल्ह्यावरील जलसंकट अद्यापही कायम आहे. 

बीड - जिल्ह्यात दीड महिन्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. आठ दिवसांत संततधार व रिमझिम पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला; मात्र जलाशयांमध्ये पाण्याची आवकच झाली नाही. रिमझिम पावसामुळे फक्त माजलगाव धरणातच केवळ एक टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. मोठ्या पावसाअभावी जिल्ह्यावरील जलसंकट अद्यापही कायम आहे. 

पावसाळ्याचे तीन महिने संपायला केवळ एका आठवड्याचा कालावधी उरला असतानाही अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाच्या गुरुवारच्या (ता.२३) अहवालानुसार जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांमध्ये आजघडीला ५.४२ टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे. गेल्या आठवड्यात हा जलसाठा ४.६८ टक्‍क्‍यांवर होता. माजलगाव या मोठ्या धरणात आजघडीला १.६० टक्के, तर मांजरा या प्रकल्पात ४.५५ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्याचा केवळ एक महिना राहिलेला असताना अद्यापही जलसंकट कायमच आहे.

आणखी चार प्रकल्प पडले नव्याने कोरडे
सध्या केवळ एक प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. याशिवाय दोन प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक, तर एका प्रकल्पात ५० ते ७५ टक्‍क्‍यांदरम्यान साठा आहे. याशिवाय २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान ६ प्रकल्पांत पाणीसाठा आहे. २८ प्रकल्पांमधील पाणीसाठा हा २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. सध्या तब्बल ८९ प्रकल्पांतील पाणी हे मृतसाठ्यात असून १७ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. गत आठवड्यात कोरडे पडलेल्या प्रकल्पांची संख्या १३ होती. मात्र दमदार पावसाअभावी यामध्ये ४ प्रकल्पांची भर पडली आहे.

मोठे प्रकल्प     २ 
मध्यम प्रकल्प १६ 
लघुप्रकल्प     १२६

एकूण प्रकल्प    साठवण क्षमता   सध्याचा साठा         वापरायोग्य पाणी
                                                                        (दशलक्ष घनमीटर)
    १४४                  १,१३७              २७७.१२५                  ४८.३५८
 

Web Title: River Water Storage Water Disaster Rain