पालकमंत्री येती घरा अन् लगबगीने खड्डे भरा!

road
road

चाकूर : लातूर - नांदेड महामार्गावर तीन महिन्यापासून पडलेल्या खड्ड्यामुळे चार जणांना जीव गमवावा लागला होता, तरीही प्रशासनाला जाग येत नव्हती, शुक्रवारी (ता. 31) पालकमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली आहे. 

लातूर - नांदेड महामार्गावर आष्टामोड पासून चापोली दरम्यान मोठ मोठी खड्डे पडले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे मोटारसायकलस्वारांना जीव गमवावा लागला आहे.  खड्याच्या चाळणीमुळे वाहनांचे नुकसान होत होते. रस्ते बुजवावे याबाबत वारंवार मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खड्डे बुजविले जात नव्हते. शुक्रवारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा अहमदपूर, जळकोट, चाकूर येथे दौरा असल्यामुळे अचानक खड्डे बुजविण्याच्या कामास सुरूवात झाली. सध्यातरी खड्डे बुजविण्याचे काम काळजीपुर्वक होत असून याभागात प्रत्येक महिन्याला पालकमंत्र्यांचा दौरा अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com