सर्व अडथळे त्वरित हटवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे करताना नागरिकांच्या भावना लक्षात घ्या. ही कामे करताना धार्मिक स्थळांसह सर्व अडथळे त्वरित दूर करा, रस्त्यांची कामे जनतेसाठी असल्याने यात कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व विभा व्ही. कंकणवाडी यांनी गुरुवारी (ता. २९) महापालिकेला दिले.

औरंगाबाद - शहरातील दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे करताना नागरिकांच्या भावना लक्षात घ्या. ही कामे करताना धार्मिक स्थळांसह सर्व अडथळे त्वरित दूर करा, रस्त्यांची कामे जनतेसाठी असल्याने यात कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व विभा व्ही. कंकणवाडी यांनी गुरुवारी (ता. २९) महापालिकेला दिले.

कंत्राटदारांची आज आयुक्तांसोबत बैठक 
बॅंक गॅरंटी व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) कंत्राटदारांची महापालिका आयुक्तांसोबत बैठक होऊन त्यांना कार्यादेश देणार असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. ५० कोटींच्या कामासाठीच्या निविदा जादा दराच्या असल्याने त्या रद्द केल्या असून, लवकरच या कामाच्या निविदा नव्याने काढण्यात येतील. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग, रोड फर्निचर आदी कामांची सुमारे एक कोटींची स्वतंत्र निविदा काढण्यात येईल, असे शपथपत्रात म्हटले आहे. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचा प्रस्ताव महापालिका १० दिवसांत रेल्वे आणि शासनास देणार असल्याचे निवेदन करण्यात आले. 

महापालिकेची हतबलता 
महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असून शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार चालू असल्याचे आयुक्तांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले असता शासनाने एक महिन्यात दोन उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्तांची महापालिकेत प्रतिनियुक्ती करण्याचे खंडपीठाने निर्देश दिले.

कोणाला कितीची निविदा?
१०० कोटींच्या कामासाठीचे लेटर ऑफ ॲक्‍सेप्टन्स कंत्राटदारांना दिले. यात जे. पी. एंटरप्राइजेस (मुंबई) २० कोटी ५३ लाख रुपयांची निविदा, मस्कट कन्स्ट्रक्‍शन्स कंपनी (औरंगाबाद) यांची २० कोटी ३२ लाखांची, जीएनआय इन्फ्रास्ट्रक्‍चर (औरंगाबाद) यांची १९ कोटी ५७ लाखांची आणि राजेश कन्स्ट्रक्‍शन कंपनी (मुंबई) यांची १८ कोटी ८८ लाखांची निविदा स्वीकारल्याचे पत्र त्यांना दिले आहे.

दीडशे कोटींतील काही प्रमुख रस्ते 
 बजरंग चौक ते चिश्‍चिया कॉलनी
 जयभवानी चौक ते सैनिक वे ब्रिज
 चिकलठाणा आठवडे बाजार ते सावंगी बायपास
 एन- १ पोलिस चौकी ते प्रोझोन मॉल
 आंबेडकर चौक ते मिसारवाडी
 सोहम मोटर्स ते महालक्ष्मी चौक
 कामगार चौक ते हायकोर्ट
 धूत हॉस्पिटल ते मूर्तिजापूर
 सेव्हन हिल ते आझाद चौकमार्गे टीव्ही सेंटर
 पीरबाजार ते जानकी हॉटेलमार्गे सूतगिरणी चौक
 हॉटेल पंचवटी ते कोकणवाडी
 मकाई गेट ते बीबी का मकबरा
 निराला बाजार ते महापालिका मुख्यालय
 आझाद चौक ते बजरंग चौक
 सिटी चौक ते पैठणगेट

Web Title: Road Work Issue High Court