कचराकोंडी फोडण्याचा रोडमॅप अखेर तयार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कचराप्रश्‍न सोडविण्याचा रोडमॅप तयार केला आहे. पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील प्रकल्प उभारणीची निविदा प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती या रोडमॅमध्ये देण्यात आली आहे. शहरातील कचरा प्रश्‍नावर बुधवारी (ता. १८) नागपूर येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पाच महिन्यांनंतरही कचराकोंडी का फुटली नाही, असा जाब विचारत धारेवर धरले होते.

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कचराप्रश्‍न सोडविण्याचा रोडमॅप तयार केला आहे. पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील प्रकल्प उभारणीची निविदा प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती या रोडमॅमध्ये देण्यात आली आहे. शहरातील कचरा प्रश्‍नावर बुधवारी (ता. १८) नागपूर येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पाच महिन्यांनंतरही कचराकोंडी का फुटली नाही, असा जाब विचारत धारेवर धरले होते. कचराप्रश्‍न कधीपर्यंत सोडविणार, याचा रोडमॅप दोन दिवसांत तयार करून तो सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी हा रोडमॅप तयार करून शासनाला सादर केला आहे. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या अनुषंगाने महापालिकेने सात वेगवेगळ्या निविदा काढल्या आहेत. या निविदांची माहिती देऊन प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना कधीपर्यंत सुरवात होईल, याची माहिती देण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत प्रकल्प उभारणीला सुरवात होईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने रोडमॅप तयार केला असला तरी शहरातील कचरा कधीपर्यंत संपणार, याची तारीख मात्र देण्यात आलेली नाही. यापूर्वीदेखील सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला आयुक्तांनी बगल दिली होती.

अशा आहेत निविदा 
नऊ झोनमध्ये २७ मशीन (स्क्रीनिंग, बेलिंग, श्रेडिंग) बसविणे - ३१ जुलै
चिकलठाणा, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पांचे बांधकाम - ६ ऑगस्ट 
कचरा संकलन, वाहतूक ः ७ ऑगस्ट
पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प - ८ ऑगस्ट.
हर्सूल येथील प्रकल्प उभारणीची निविदा - २६ ऑगस्ट. 
कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेनायझेशन प्रकल्प उभारणे - २० सप्टेंबर. 

Web Title: roadmap ready for garbage issue municipal