रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

धानोरा - आष्टी तालुक्‍यातील धानोरा येथे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा देण्यासाठी बाहेरगावातील व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी येत आहेत. मात्र, विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होत आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे ब्रीदवाक्‍य फक्त कागदावरच का? पोलिस रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार का? असा संतप्त सवाल धानोरा चिंचोली, साबलखेड, हिवरा, पिंपरखेड, कुंभारवाडी, सुलेमान देवळा, भोजेवाडी, वाघळूज, नांदूर, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, पुंडी, शिरापूर, मेहकरी व परिसरातील पालकांतून होत आहे. 

धानोरा येथे बाहेरच्या गावातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. धानोरा बसस्थानक ते दोन्ही महाविद्यालये लांब अंतरावर असल्याने बसस्थानक, हिवरारोड, जनता उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंकडून बाईकवर ट्रिपलसीट येऊन कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, शिट्टी वाजविणे, अश्‍लील हावभाव करणे, मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार होत आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुणींनी महाविद्यालयीन शिक्षणाला मध्येच बाय बाय केले आहे.

पोलिस अधीक्षकांनी महिला व मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्‍यात दामिनी पथक नियुक्त केले आहे; परंतु हे दामिनी पथक धानोरा येथे येऊन कारवाई का करत नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title: Roadromio Girl Student Stricken Crime Police