सात महिन्यांनंतरही औरंगाबादमधील रस्ते अपूर्णच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

शासन निधीतून 30 रस्त्यांची कामे सुरू होऊन सात महिने उलटले आहेत. मात्र एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कंत्राटदारांना
नोटिसा बजावल्या असून, त्याची मुदत शुक्रवारी (ता. दोन) संपणार आहे. कंत्राटदारांनी समाधानकारक खुलासा केला नाही तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

औरंगाबाद - शासन निधीतून 30 रस्त्यांची कामे सुरू होऊन सात महिने उलटले आहेत. मात्र एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कंत्राटदारांना
नोटिसा बजावल्या असून, त्याची मुदत शुक्रवारी (ता. दोन) संपणार आहे. कंत्राटदारांनी समाधानकारक खुलासा केला नाही तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

शासन निधीतून महापालिकेने राजेश कन्स्ट्रक्‍शन, मस्कट कन्स्ट्रक्‍शन, जीएनआय कन्स्ट्रक्‍शन आणि जेपी कन्स्ट्रक्‍शन या चार कंत्राटदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांची कामे दिली आहेत. 30 रस्त्यांची कामे करण्यासाठी 12 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत केवळ 16 रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली. त्यातील एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण यांनी चारही कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

खुलासा सादर करण्यासाठी त्यांना दोन ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, महापौरांनीदेखील रस्त्यांची पाहणी करून दहा रस्त्यांची कामे कोणत्याही परिस्थितीत 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशालाही कंत्राटदारांनी केराची टोपली दाखविली आहे. दरम्यान, कंत्राटदारांचा खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads incomplete even after seven months