औरंगाबाद : चक्क 35 वर्षांनी पकडले दरोड्यातील आरोपीला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

औरंगाबाद - सुमारे 35 वर्षांपूर्वी साथीदारांच्या मदतीने छावणी परिसरात दरोडा घालून फरार झालेल्या चंद्रकांत गुरुदास खराडे (वय 59, रा. लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी) याला गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी (ता. 12) गजाआड केले, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली. 

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडे याने वर्ष 1984 मध्ये साथीदारांच्या मदतीने छावणी परिसरात दरोडा घातला होता. तेव्हापासून तो फरार होता. या काळात तो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होता.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, सहायक फौजदार नितीन मोरे, जमादार भगवान शिलोटे, विलास वाघ, संजय खोसरे, विशाल पाटील, मुक्तेश्वर लाड, अनिल थोरे आदींच्या पथकाने खराडे याला अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robber arrested at Aurangabad