तलवार गळ्यावर ठेवून एकाला लुटले 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नांदेड : एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यावर तलवार ठेवून जबरीने रोख रक्कमेसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे सोमवारी (ता. 17) रात्री आठ वाजता घडली. 

नांदेड : एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यावर तलवार ठेवून जबरीने रोख रक्कमेसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे सोमवारी (ता. 17) रात्री आठ वाजता घडली. 

मुदखेड येथील राहूल भिमराव चौदंते (वय 30) हे कामानिमित्त सोमवारी आपल्या दुचाकीवरुन नांदेडला आले होते. काम आटोपून ते एका मित्रासोबत रात्री न्यायालयाच्या पाठीमागून हिंगोली गेटकडे जात होते. रात्री आठच्या सुमारास त्यांची अनोळखी चार चोरट्यांनी त्यांना अडविले. तुम्हारे पास कितने पैसे है, तो निकाल के दो, असे म्हणून दोघांनी आपल्या हातातील तलवार दोघांच्याही गळ्यावर ठेवल्या. जास्त हुशारी केली तर कापून टाकील अशी धमकी दिली. त्यांच्या खिशातील रोख सहा हजार 10 रुपये, दोन मोबाईल आणि दुचाकी जबरीने चोरून नेली. जवळपास 45 हजाराचा ऐवज लंपास केला. भयभीत झालेले राहुल चौदंते व त्याचा मित्र यांनी वजिराबाद ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, फौजदार किरण पठारे यांनी घटनास्थळ गाठले. तसेच वजिराबाद भागात नाकाबंदी केली. मात्र चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाही. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही शहरात अनेक भागात पहाणी केली. या गंभीर घटनेची दखल पोलिस अधिक्षकांनी घेतली असल्याने स्थानिक गुन्हे शाखा व वजिरबाद पोलिस कडाक्याच्या थंडीत चांगलेच घामाघुम झाले होते. राहूल चौदंते याच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात चार जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार किरण पठारे हे करीत आहेत.  

Web Title: robber robbed with sword