दरोडेखोरांची टोळी अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 27 जुलै 2018

नांदेड : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी गुरुवारी (ता. 26) रात्री देगलूर नाका भागातील महेबुबनगर मधून आंतरराज्यीय टोळी अटक केली. चार जणांच्या मुसक्या आवळण्यास यश आले मात्र एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या टोळीतील अटक आरोपीने अर्जुन डोंगरे याच्या सांगण्यावरून महेबुबनगर येथील नितीन बबन इंगोले याचा १८ जून २०१८ रोजी मालटेकडी रेल्वेस्थानक परिसरात खून केल्याची कबुली दिली.

 अटक आरोपीत पी. नवीन पी. राजन्ना ( वय २५) रा. गन्नाराम ता. डीचपली, निझामबाद, सयद अहमद सयद आजम ( वय २४ ) रा. जलापली ता. कोडगिरी, जि. निझामबाद, दिनेश मेघराज परमार ( वय १९ ) रा. विष्णुपुरी, नांदेड आणि अर्जुन भारत डोंगरे ( वय २० ) रा. महेबुबनगर, महाकाली मंदिर देगलूर नाका नांदेड यांना अटक केली. तर जी. प्रविण जी. रामला हा फरार झाला. यांच्यावर खून, जबरी चोरी, दरोडा आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या दरोडेखोरांकडून एक पीस्तुल, तलवार, तीन खंजर, मोठा दोरखंड, चाव्यांचा गुच्छ आणि कटर आदी साहित्य जप्त केले.

विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरून विमानतळ ठाण्यात दरोडा व खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या पथकाचे एसपी चंद्रकिशोर मिना, अतिरिक्त एसपी मंगेश शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्र सहाने यांनी अभिनंदन केले.

Web Title: robbers arrested in nanded