पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून दरोडखोर कर्नाटकात पळाले

युवराज धोतरे
शुक्रवार, 17 मे 2019

उदगीर : शहर व परिसरात सध्या चोरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.16) रात्री दोनच्या सुमारास बनशेळकी रोड परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीसाना एक संशयित टाटा पिकअप आढळून आली. त्यांनी त्यांची चौकशी करत असताना त्यांनी गाडी चालु करून पळ काढला त्यांचा पाठलाग करत असताना  पिकअप मधून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून ते दरोडेखोर कर्नाटकात पळून जाण्यास यशस्वी झाले.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्त घालत होते. यावेळी उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमाशंकर हिरमुखे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट, लातूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह ग्रामीणच्या डीबी विभागातील नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, कैलास चौधरी यांचा  ताफा वळण रस्त्याने जात होता. वळण रस्त्याने जात असताना एक महिंद्रा पिकअप बनशेळकी रोडहुन शहराकडे येत असल्याचे त्यांना दिसले. या पिकअप मध्ये समोर दोन-तीन व पाठीमागे चार जण बसले होते.पोलीस उपाधीक्षक श्री हिरमुखे यांनी या पिकअपला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता गाडी थांबण्याऐवजी जोराने रेल्वे लाईनच्या बाजूने वेगाने पुढे निघाली या पोलिसांना संशय आल्याने दरोडेखोरांच पाठलाग सुरू केला.

पुढे दरोडेखोरांचे पिकअप त्यापाठीमागे पोलिसांच्या गाड्या सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना हा पिकअप येणकी-मानकी रस्त्यावरून तोगरी कडे निघाला. त्याच्यापाठोपाठ पोलिसांच्या गाड्या निघाल्या जवळ गेल्यानंतर पोलीसगाडीवर पिकपमध्ये भरून ठेवलेले दगड मारण्यात येऊ लागले. पोलीस गाडीच्या जाळीमुळे काचा सुरक्षित राहील्या. वायरलेस वर सगळीकडे नाकाबंदी व चेकपोस्टवर नाकाबंदी लावण्यात आल्याने तोगरी मोड येधे दरोडेखोरांची पंचाईत झाली त्यांनी तेथून पिकप फिरून परत येऊन वेल्हाळ मार्गे मूर्कीकडे वेगाने गेले व कर्नाटकात हे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. शेवटी लातूर पोलिसांनी कर्नाटकातील मूर्तीपर्यंत या दरोडेखोरांचा पाठलाग केला. परंतु पोलिसाकडे अद्ययावत वाहने नसल्याने दरोडेखोरांना पकडण्यात त्यांना यश आले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbers ran away after stone pelting on police