नांदेड : सव्वातीन लाखांची घरफोडी 

thief
thief

नांदेड : आपले घर बद करून शहरातील एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सव्वातीन लाखाचा एेवज लंपास केला. ही घटना 30 डिसेंबरच्या रात्री सात ते दहाच्या सुमारास प्रेमनगर येथे घडली. 

जैनमंदीर परिसरात मालेगाव रस्त्यावर असलेल्या प्रेमनगर भागात व्यापारी संदीप शंकरराव कांबळे हे राहतात. ते साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी शहरातील हॉटेल अतिथी येथे परिवारासह गेले होते. घराला कुलूप लावून मुख्य फाटकालाही कुलूप लावून हा परिवार गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत अवघ्या दोन तासाच्या आता म्हणजेच सायंकाळी सात ते दहाच्या सुमारास घरात प्रवेश मिळविला. कपाटातील रोख रक्कम तीन लाख 20 हजार रुपये लंपास केले. यावेळी चोरट्यांनी घरातील किंमती सामानाची तोडफोड केली.

साखरपुडा कार्यक्रम आटोपून कांबळे परिवार परत रात्री आपल्या घरी गेला. यावेळी फाटकाचे व मुख्य दाराचे कुलूप तोडल्याचे दिसले. घरात जाऊन पहातात तर काय चोरट्यांनी घरातील रक्कम पळविली होती. त्यांनी लगेच भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के आणि निरीक्षक अनिरुध्द काकडे हे आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांनी कुठलाच माग मागे ठेवला नसल्याने पथकाला परत जावे लागले. संदीप कांबळे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला फौजदार संगिता कदम ह्या करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com