पोलिस निरीक्षकाच्या घरावरच दरोडा, तीन लाखांचा ऐवज पळविला

Robbery
Robbery
Summary

त्यांनी ताबडतोब देविदास लिंबाजी अंकुसे आणि त्यांची पत्नी विमल अंकुसे यांचे हात व पाय बांधले. त्यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. कपाटाच्या चाव्या मागून घेतल्या.

कळंब (जि.उस्मानाबाद) : पोलिस निरीक्षकाच्या घरावरच चोरट्यांनी दरोडा टाकला असून त्यांच्या आई-वडिलांचे हातपाय बांधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तालुक्यातील हावरगाव येथील देविदास लिंबाजी अंकुसे यांच्या घरावर रविवारी (ता.२०) पहाटे साडेबाराच्या सुमारास चार ते पाच जणांनी मिळून दरोडा टाकला. यामध्ये रोख रकम ३० हजार रुपये व साडेआठ तोळे सोन्याचे दागिने असा तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवले. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वाकडी (ता.कळंब) Kalamb येथील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक एम.डी.अंकुसे Police Inspector M.D.Ankuse हे नांदेड Nanded येथे कार्यरत आहेत. पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील हावरगाव येथे पोलिस निरीक्षक अंकुसे यांचे घर आहे. त्यांचे आई-वडील त्या घरामध्ये राहतात. दरम्यान रविवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास चार ते पाच चोरट्यानी अंकुसे यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब देविदास लिंबाजी अंकुसे आणि त्यांची पत्नी विमल अंकुसे यांचे हात व पाय बांधले.Robbery At Police Inspector Home In Kalamb Tahsil Osmanabad News

Robbery
राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?

त्यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. कपाटाच्या चाव्या मागून घेतल्या. कपाटातील सोने Gold व रोख रक्कम असे ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज पळविला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, पोलिस कर्मचारी गणेश वाघमोडे, श्री.जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपथकास पाचारण केले. रामभाऊ या श्वानने तालुक्यातील वाकडी येथील पारधीवस्तीवर माघ दाखविला. पोलिसांनी तातडीने एका संशयिताना ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील आणखीन आरोपीच्या शोधत पोलिस असून, या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. पाटील करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com