चोरट्यांनी घरफोडी करून साडेसहा लाखाचा ऐवज लांबवला

नवनाथ इधाटे
बुधवार, 5 जून 2019

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील (जि. औरंगाबाद) वारेगाव येथील गावापासून सुमारे दोन किलोमीटर शेतवस्तीवर राहत असलेल्या कडूबा कुशाबा मोरे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दीड लाख रोख रक्कम व सुमारे पाच लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 4) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

घरापासून एक हजार फुटावर घरातील पत्राच्या पेट्या घेऊन तेथे पेटीतील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज काढून उर्वरित पेटीतील साहित्य तसेच पडून होते. श्वान ने तीन किमी अंतर फिरून फुलंब्री खुलताबाद या मुख्य रस्त्यावर येऊन घुटमळला. त्यामुळे श्वानलाही माग काढता आला नाही. तसेच गावातही दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. यावेळी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चोरीच्या घटनेचा तपास  करीत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery at home Fulambri Aurangabad