माजलगावात दुकान फोडून साडेतीन लाखांचे साहित्य लंपास

कमलेश जाब्रस
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शहरातील जुना मोंढा भागातील एका पान मटेरियलच्या दुकान फोडून चोरट्यांनी साडे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना सोमवारी समोर आली.

माजलगाव : शहरातील जुना मोंढा भागातील एका पान मटेरियलच्या दुकान फोडून चोरट्यांनी साडे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना सोमवारी समोर आली.

 जुना मोंढा भागात नाईक एजन्सीज् नावाचे पान मटेरियलचे दुकान आहे. या दुकात अज्ञात चोरट्यांनी शटरची पट्टी तोडली व आत प्रवेश केला. या चोरट्यांनी साडे तिन लाखांचे पान मटेरियलचे साहित्य लंपास केले आहे.

शहरामध्ये चो-यांचे सत्र सुरूच असुन पोलिसांना मात्र अद्यापही या चोरट्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सणासुदीचा काळ असुन पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान चोरी झालेल्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी गर्दी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in Majalgaon

टॅग्स