ज्वेलर्सचे दुकान फोडून दागिने चोरले

आनंद खर्डेकर
बुधवार, 9 जानेवारी 2019

परंडा : येथील मुख्य बाजारपेठेतील वर्धमान ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान फोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. बुधवारी (ता. 9) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील मंडई पेठेतील मुख्य बाजारपेठेत बेदमुथा बंधुंचे वर्धमान ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र चोरटे दुचाकी ढकलत दुकानाजवळ आले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत दुकानातील साहित्याची लुट केली. चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. नेमकी किती रूपयांची चोरी झाली, हे अद्याप समजले नाही. पोलिस सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झाले आहेत. सकाळी आठ वाजता परंडा पोलिसांसह उस्मानाबाद येथील ठसे तज्ज्ञ पथक दाखल झाले असून, दुकानातील पंचनामा करण्यात येत आहे. घटनास्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेतील या प्रकारामुळे व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरातील याच बाजारपेठेतील दुकानांसमोर रात्री लिंबु, सुया टाकून भिती निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकारही सिसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे.

Web Title: robbery at paranda in jwellers shop