जालना : चोरी करणारे दोन संशयित अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

चोरट्यांनी कार्यालयातील फायली अस्तावस्त केल्या. दरम्यान कार्यालयातुन काहीही चोरीला गेले नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरित अर्जुन सिंग भोंड आणि अर्जुनसिंग तलानी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी अजुन एका संशयिताचे नाव पुढे आले, असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

जालना : भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगर येथील यांचे मोरेश्वर सप्लायर्स हे खासजी कार्यालय फोडणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.आठ) अवघ्या सहा तासात अटक केली आहे.

सकलेचानगर येथील मोरेश्वर सप्लायर्सचे खासगी कार्यालयात शनिवारी (ता. आठ) पहाटे साडेतीन वाजन्याच्या सुमारास चोरी केली. तीन चोरट्यांनी कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकास मारहाण करीत कार्यालयाच्या खिडकीतुन दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॉमेरा विरोध दिशेला फिरवला तर कार्यालयातील सीसीटीव्ही कॉमेरा फोडला.

चोरट्यांनी कार्यालयातील फायली अस्तावस्त केल्या. दरम्यान कार्यालयातुन काहीही चोरीला गेले नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरित अर्जुन सिंग भोंड आणि अर्जुनसिंग तलानी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी अजुन एका संशयिताचे नाव पुढे आले, असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

Web Title: robbery in Raosaheb Danve office in Jalna