निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून निवृत्त न्यायाधीश यांचे घर फोडून चोरट्यांनी पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून निवृत्त न्यायाधीश यांचे घर फोडून चोरट्यांनी पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

निवृत्त न्यायाधीश लक्ष्मण नागोराव देवकर हे मालेगाव रस्त्यावरील स्वयमवर मंगल कार्यालयामागील झेंडा चौकात असलेल्या स्वप्नजा गार्डन भागात राहतात. त्यांचा मुलगा मध्यप्रदेश मध्ये नोकरीला असून त्याच्याकडे ते पत्नीसह 20 डिसेंबर रोजी जाणार होते. त्यामुळे ते व त्यांची पत्नी 18 डिसेंबर रोजी दुपारी शहरात खरेदीसाठी घराला कुलूप लावून गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेचार ते सातच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम वीस हजार सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख 88 हजार आठशे रुपयांचा ऐवज लंपास केला. देवकरे दांपत्य हे खरेदी करून परतल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटात जाऊन बघितले असता सोन्याचे दागिने सोनसाखळी, सोन्याच्या बांगड्या, तिन अंगठी, दोन पाटल्या, सोन्याचे बिस्किट असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. देवकर यांनी भाग्यनगर पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस उपाधीक्षक अभिजीत फस्के यांनी हे घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. फिंगरप्रिंट पथकही घटनास्थळी दाखल झाले. परंतु चोरट्यांनी कुठलाच पुरावा ठेवला नसल्याने श्वानपथकाला खाली हात परतावे लागले. लक्ष्मण देवकर यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवन डमाले हे करीत आहेत.

Web Title: robbery at retired judge s home