esakal | नांदेड : सन्मित्र कॉलनीत घरफोडी; 9 लाखांचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : सन्मित्र कॉलनीत घरफोडी; 9 लाखांचा ऐवज लंपास

शहराच्या सन्मित्र कॉलनीतील एका सेवानिवृत्त अभियंत्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख असा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला.

नांदेड : सन्मित्र कॉलनीत घरफोडी; 9 लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहराच्या सन्मित्र कॉलनीतील एका सेवानिवृत्त अभियंत्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख असा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी बुधवारी (ता.4) पहाटे दोन ते चारच्या सुमारास झाली. 

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्कशॉप परिसरात असलेल्या सन्मित्र कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त अभियंता लक्ष्मण व्यंकटेश शेटी (भरडे) यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी ते आपल्या परिवारासह राहतात. मंगळवारी रात्री जेवण करून ते आपल्या बैठकीत झोपले. बुधवारी (ता. चार) पहाटे दोन ते चारच्या वेळेस अज्ञात चोरटे हे घराच्या मागच्या बाजूने वर चढले. छतावरून त्यांनी घरात प्रवेश केला.

शेटी व त्यांचा परिवार ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीच्या बाजूला असलेल्या बेडरुममध्ये घुसले. कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिणे व नगदी असा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. ही बाब सकाळी उघडकीस आली. घरातील सीसीसीव्ही फुटेज तपासले असता चोरटे त्यात कैद झाले. दोरीच्या सहाय्याने वर चढून त्याच मार्गे खाली उतरले. या धाडशी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

लक्ष्मण शेटे यांनी भाग्यनगर पोलिसांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी आपल्या वरिष्ठांना सांगून पथकासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोलिस उप-अधीक्षक अभिजीत फस्के यांनी भेट दिली. श्‍वान व ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्यांच्याही हाती काही लागले नाही. चौकशीअंती लक्ष्मण शेटे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द बुधवारी (ता. चार) दुपारी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. तपास फौजदार एम. व्ही. दळवे हे करीत आहेत.   

loading image
go to top