नुकसान भरपाईसाठी रास्तारोको

रास्तारोको
रास्तारोको

हिंगोली, जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या मागणीसाठी मराठा शिवसैनिकसेनेतर्फे कामठा फाटा (ता.कळमनुरी) येथे शनिवारी (ता.९) सकाळी एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नांदेड व हिंगोली मार्गावरील वाहतुक एक तास ठप्प झाली होती. 

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर कामठा फाटा येथे सकाळी आकरा वाजता रस्तारोको सुरु करण्यात आला. यावेळी रस्तावर बैलगाडी सोडण्यात आली होती. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील, विठ्ठल मोरे, रावसाहेब अडकिणे, पराग अडकिणे, रमेश अडकिणे, भरत देशमुख, श्रीराम काळे, सचिन मिरासे पाटील, सय्यद आयाज, लक्ष्मीकांत देशमुख, अजय पतंगे, ऋषीकेश देशमुख, इरफान पठाण, दत्तराव अंभोरे, जनार्धन मईंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. 

यावेळी श्री. भिसे पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांनी तातडीने भरीव मदत दिली पाहिजे. पिकांचे पंचनामे योग्य पध्दतीने झाले पाहिजे यावर प्रशासनाने लक्ष  द्यावे. नुकसान भरपाई पासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहिल्यास वेळ प्रसंगी रुमणे हातात घेऊ असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर कळमनुरीचे नायब तहसीलदार प्रविण ऋषी, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनामुळे नांदेड व हिंगोली मार्गावील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com