भाव घसरल्याने कोथिंबिरीवर रोटावेटर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोथिंबिरीचे भाव घसरल्याने कनगरा (ता. उस्मानाबाद) येथील गोविंद ढोबळे यांनी त्यांच्या शेतातील तीन एकरांतील कोथिंबीर पिकावर रविवारी (ता. 11) रोटावेटर फिरवून पीक मोडीत काढले. 

पाडोळी (जि. उस्मानाबाद) ः कोथिंबिरीचे भाव घसरल्याने कनगरा (ता. उस्मानाबाद) येथील गोविंद ढोबळे यांनी त्यांच्या शेतातील तीन एकरांतील कोथिंबीर पिकावर रविवारी (ता. 11) रोटावेटर फिरवून पीक मोडीत काढले. 

गेल्या महिन्यात कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अल्प पावसावर कोथिंबीर पीक घेतले. मात्र पावसाने मारलेली दडी, कोथिंबिरीची बाजारात वाढलेली आवक, त्यावर पडलेल्या करपा रोगामुळे भाव कोसळले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत एकरी कोथिंबिरीला दोन लाखांवर मागणी होती; मात्र सध्या एक कॅरेट अवघ्या पन्नास रुपयांना विक्री होत आहे.

त्यामुळे कोथिंबिरीच्या लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्‍किल झाले असल्याने किमान शेतात खत होईल, या उद्देशाने शेतकरी या पिकावर रोटावेटर फिरवत आहेत. 
 

कोथिंबिरीला भाव आहे म्हणून तीन एकरांत कोथिंबिरीचे पीक घेतले. मात्र पावसाने दिलेली ओढ आणि त्यावर पडलेल्या रोगामुळे भाव कमी झाले आहेत. तरीही एका व्यापाऱ्याला 50 रुपये दराने एक कॅरेट दिले होते; मात्र त्यानेही नंतर नकार दिल्यामुळे हे पीक मोडीत काढले. तीन एकरांवर जवळजवळ 35 हजार रुपये खर्च करूनही त्याचा उपयोग झाला नाही. 
- गोविंद ढोबळे, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotavator on the coriander crop as prices fall