दोन एकरातील मका पिकावर चालवला रोटाव्हेटर; पाऊस नसल्याने हातची गेली पिके 

गोपाल गुंडगे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

तालुक्‍यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे हाता तोंडांशी आलेले पिके वाळू लागली आहेत. बोरगाव परिसरातील सोनाअप्पावाडी येथील शेतकरी गणेश महेर यांनी दोन एकरात मकाचे पिक घेतले होते. यासाठी महागडे बि-बियाणे, खतांचा वापर केला, पेरणी, निंदणी खुरपणीवर करून त्यांनी हे पिक जगवले होते.

भराडी : बोरगाव बाजार (ता. सिल्लोड) परिसरात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. रविवारी (ता. 12) गावातील गणेश महेर या शेतकऱ्यांनी दोन एकरावर उभ्या असलेल्या मकाच्या पिकावर रोटोव्हेटर चालवित हे पिक काढून टाकले. 

तालुक्‍यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे हाता तोंडांशी आलेले पिके वाळू लागली आहेत. बोरगाव परिसरातील सोनाअप्पावाडी येथील शेतकरी गणेश महेर यांनी दोन एकरात मकाचे पिक घेतले होते. यासाठी महागडे बि-बियाणे, खतांचा वापर केला, पेरणी, निंदणी खुरपणीवर करून त्यांनी हे पिक जगवले होते. मात्र पंचवीस दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे हे मकाचे पिक पुर्णता वाळून गेले. यामुळे नाईलाजास्तव महेर यांनी या उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालवावा लागला. 

गेल्या वर्षी बोंड आळीने मारले. यामुळे यंदा मकाचे पिक घेतले यातून काहीचा दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र पावसाअभावी हे पिकही हातचे गेले. यासह पिकासाठी बियाणे, रासायनिक खते, पेरणी, निंदणी साठी झालेला खर्च व पुढे जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची टंचाईमुळे बैलजोडी विकायची वेळ आली आहे. - गणेश कचरु महेर, शेतकरी 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rotavator was operated on two acres maize crops at bharadi aurangabad