आरपीएफकडून रेल्वेप्रवाशांना शिस्तीचे धडे

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नांदेड :  येथील हजूर साहिब रेल्वे स्थानकावर वाढत्या चोऱ्या, पाकिटमारी, बॅग लिफ्टींग, पर्स पळविणे, मोबाईल चोरी यासारख्या घटनांना प्रवाशी बळी पडून नये आणि चोरट्यांना आवर घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यात येत आहेत. देवगिरी व नंदीग्राम रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रांगेचा वापर करण्यात येत आहे. यामुळे चोरीच्या घटनांत कमालीची घट झाल्याचे आरपीएने सांगितले. 

हजूर साहिब रेल्वेस्थानक दक्षिण मध्ये रेल्वेच्या काही महत्वाच्या व मोठा महसुल देणारे स्थानक आहे. या स्थानाकवरून दररोज शंभरहून अधिक रेल्वे गाड्या ये- जा करतात. त्यात काही मालगाड्या तर काही प्रवाशी गाड्यांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहर हे देशातील महत्वाच्या शहराना रेल्वेमार्गानी जोडण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी शिख समाजाचा सचखंड गुरूद्वारा आहे. गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील हजारो भाविक रेल्वेद्वारे ये- जा करतात. तसेच या ठिकाणी सराफा, कापड, टींबर, भुसार, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासाठी काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात नांदेडला येतात. या प्रवाशांना अनेक वेळा नांदेड रेल्वेस्थानकावर चोरट्यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा बॅग पळवणे, मोबाईल चोरी, महिलांच्या पर्स लंपास करणे, झोपेतील प्रवाशांना लुटने यासह आदी घटना वाढत आहेत. स्थानकावर पाकिटामारांचा व चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने जीआरपी (लोहमार्ग पोलिस ) आणि आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) यांची डोकेदुखी वाढली आहे. 

चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा, अशा घटना घडू नये तसेच प्रवाशी व त्यांचे सामान सुरक्षीत रहावे यासाठी सर्वसाधारण बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रांग तयार करण्यात येत आहे. आरपीएफ जवान यासाठी प्रयत्न करून प्रवाशांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी सतत धडपडत आहेत. आरपीएफचे सुरक्षा आयुक्त यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक एन. पी. सिंह यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत हा पर्याय सुरू केल्याने मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनात घट झाली आहे. तर प्रवाशांनाही प्रवास सुखकर होत असल्याचे पहावयास मिळाले. 
 
Web Title: RPF teaches lessons to train passengers