'...तर संघावर बंदी घालू'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

बीड - प्रत्येक संघटनेला नोंदणी आवश्‍यक आहे. मग, आरएसएसला का नाही? मोहन भागवत बंदूक घेऊन फिरतात, त्यांना काहीच होत नाही. आम्हाला वेगळा आणि आरएसएसला वेगळा कायदा का?, वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर आरएसएसने नोंदणी न केल्यास त्यांच्यावर बंदी घालून जेलमध्ये टाकू, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा शनिवारी (ता. १२) झाली. यावेळी ॲड. आंबेडकर बोलत होते. आरएसएसने नोंदणी न केल्यास काय भूमिका घेणार यावर काँग्रेस गप्प आहे. त्यांनी भूमिका जाहीर करेपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही ते म्हणाले. देशाला विकास, रोजगार देणे अपेक्षित असताना दहा टक्के आरक्षण देऊन हे सरकार फसवे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. नोटाबंदीद्वारे कमावलेल्या पैशातून भाजप निवडणुकीत पाच हजार रुपयांना मत विकत घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, किसन चव्हाण, मुफ्ती कामीर, सचिन माळी, इंदरकुमार भिसे, नवनाथ पडाळकर, शेख निझाम, विष्णू देवकते, गंगाभीषण थावरे आदींची उपस्थिती होती. 

‘पाकिस्तानातून साखर का?’
गरजेपेक्षा २० टक्के साखर अधिक उत्पादित होत असताना सरकारने पाकिस्तानातून २० लाख टन साखर आयात केली. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदार अडचणीत आले. मात्र, चौकशीच्या धाकाने काँग्रेस, राष्ट्रवादी मोदींना विचारत नाहीत, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले. नव्वद दिवसांनी लोकसभेची निवडणूक आहे. आज आम्ही लोकसभेपूर्वी-विधानसभा उमेदवार जाहीर करू इच्छित होतो. मात्र, आता उमेदवारी जाहीर झाली तर जिवे मारण्याची भीती असल्याचे अनेक इच्छुकांनी सांगितले, असा गंभीर आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

सरकारवर आरोप  
  भ्रष्टाचाराचे कारण देत राज्य सरकारने ४१ योजना बंद केल्या. 
  राज्यात दुष्काळ असताना चारा-पाण्याचे नियोजन नाही. 
  गोदामांत लाखो टन धान्य असतानाही सरकारने जनावरांना दिले नाही. 
  भाजप-आरएसएसला केवळ हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास. 

Web Title: RSS Ban Prakash Ambedkar