सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांची औरंगाबादेत बैठक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने संघाची भूमिकेविषयी ही बैठक घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांचे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार स्मारक निधी भाग्यनगर प्रल्हाद भवन येथे संघ कार्यकर्त्यांसमवेत सकाळी 8:30 वाजेपासून बैठक सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने संघाची भूमिकेविषयी ही बैठक घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र संघाचे ज्येष्ठ प्रचारक कथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य मधुभाई कुलकर्णी यांच्या भेटीसाठी ही बैठक घेण्यात येत असल्याची माहिती संघाचे समन्वयक रोहित सर्वज्ञ यांनी सांगितले.

Web Title: RSS chief Dr Mohan Bhagwats is in Aurangabad for a meeting