नियम मोडण्यात लातूरकर अव्वल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल दीड हजार वाहनांवर गेल्या पंधरा दिवसांत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून अशा बेशिस्त वाहनचालकांकडून साडेतीन लाख रुपयांचा दंड जमा केला आहे. या आकडेवारीवरून वाहतुकीचे नियम मोडण्यात लातूरकर अव्वल असल्याचेच स्पष्ट होत आहे.

लातूर - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल दीड हजार वाहनांवर गेल्या पंधरा दिवसांत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून अशा बेशिस्त वाहनचालकांकडून साडेतीन लाख रुपयांचा दंड जमा केला आहे. या आकडेवारीवरून वाहतुकीचे नियम मोडण्यात लातूरकर अव्वल असल्याचेच स्पष्ट होत आहे. 

कार्यसुलभता आणि पारदर्शकता वाढावी म्हणून म्हणून ‘एक देश, एक चालान’ पद्धत सरकारने स्वीकारली आहे. त्यानुसार शहरात ई- चालान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करून वाहनचालक दंड भरू शकतात. ही सुविधा सुरू होऊन १५ दिवस झाले. या दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचा दंड कॅशलेस पद्धतीने जमा केला आहे. हे हायटेक झालेल्या वाहतूक पोलिसांचे यश असले तरी वाहनचालक मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच यातून समोर येत आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, परवाना नसताना वाहन चालविणे, विनाकारण मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, वेगमर्यादेचे पालन न करणे, सिग्नलला न थांबणे... अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पंधरा दिवसांत ९५८ दुचाकीचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ऑटोचालकही नियम मोडण्यात आघाडीवर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO Crime Vehicle Fine Recovery