कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

RTO-Issue
RTO-Issue

औरंगाबाद - वाहतूक शाखा डिजिटल होत असताना तांत्रिक त्रुटीतही वाढ होत आहे. नियमभंग करणारे वाहन व चालक एक आणि नोटीस दुसऱ्याला दिल्याचा प्रकार उजेडात आला. असे प्रकार यापूर्वीही घडले असून, यातून ज्यांची चूक नाही अशा वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओॲसिस चौक, एमआयडीसी वाळूज भागात २२ ऑक्‍टोबरला सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी एका दुचाकीवरून तरुण जात होता. त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. ही बाब कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. सेफ सिटी प्रकल्पांतगत वाहतूक शाखेतर्फे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वाराला नोटीस पाठवली जाते. त्यात सय्यद रऊफ सय्यद जफर (रा. सादातनगर) यांना नोटीस पाठविण्यात आली. यात नोटीस मिळाल्यापासून १४ दिवसांच्या आत पोस्ट कार्यालय अथवा ॲक्‍सिस बॅंकेच्या खात्यात अपराधाबाबत तडजोड शुल्कापोटी पाचशे रुपये भरावेत, अशी सूचना करण्यात आली. पैसे न भरल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असा इशाराही नोटिसीमध्ये होता. मुळात नियमभंग करणाऱ्या दुचाकीचा क्रमांक सीसीटीव्हीत कैद कॅमेऱ्यानुसार (एमएच १९ बीए ३४७०) हा आहे. तसा फोटोही आहे. पण, नोटीस (एमएच २०, बीए ३४७०) या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला पाठविण्यात आली. 

नाहक मनस्ताप
गत काही दिवसांपासून घरपोच पावती पाठवताना तांत्रिक व मानवी चुका होत आहेत. परिणामी, ज्यांचा संबंध नाही अशा वाहनधारकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, यातून वाहतूक विभागाचा प्रतापही समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com