जागेवरच काढ पैसे अन्‌ फाड पावती

वाळूज - वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकास अडवताना वाहतूक पोलिस.
वाळूज - वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकास अडवताना वाहतूक पोलिस.

वाळूज - वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या, तसेच विनाहेल्मेट, राँग साईड, विनापरवाना, ट्रिपलसीट, क्षमतेपक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर वाळूज वाहतूक शाखेकडून शनिवारी (ता. २३) वाळूज परिसरातील विविध चौकांत करवाई करण्यात येऊन पन्नास ते साठ जणांकडून दंड वसूल करण्यात आला.

वाळूज औद्योगिक वसाहतीत अवजड वाहनांची ये-जा असते. शिवाय औरंगाबाद-नगर महामार्ग जात असल्याने इतर वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. अशातच अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहन चालवत असतात. अनेक वेळा वाहनचालक आणि वाहतूक पोलिस यांच्यामध्ये वाद होतात. नियम मोडून पोलिसांशी हुज्जत घालतात. याला स्मार्ट उपाय शोधत स्मार्ट कारवाई करण्यास सुरवात केली. 

मात्र, यालाही वाहनधारक जुमानत नसल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी ‘काढ पैसे फाड पावती’ असे म्हणत जागेवरच दंड वसूल करून बेशिस्त वाहनधारकांना पावती देत आहेत. यावेळी ट्रिपलसिट, विनाहेल्मेट, विनालायसन्स धारकांसोबत हुज्जत घालण्यापेक्षा थेट वाहनचालकाचा त्याच ठिकाणी त्याच्या वाहनाचा व त्याचा फोटो काढून कारवाई केली. यावेळी वाहनधारकांचे लायसन्स, वाहनाची कागदपत्रे, हेल्मेट, वाहन तपासणी करण्यात आली.

३० जणांकडून जागेवरच दंड वसुली 
पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाळूज महानगरातील ए. एस. क्‍लब चौकात शनिवारी (ता. २३) दिवसभर बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी अनेकांनी पोलिसांना पाहून परत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दंड वसूल केला. ही कारवाई के. जी. गायकवाड, डी. एस. चव्हाण, पोलिस हवालदार एस. सी. बिगोद, पो. कॉ. प्रदीप भदर्गे, अरुण सोळंके आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com