आरटीओने दिला फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या जुगाड टेक्‍नॉलॉजीने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे ‘सकाळ’ने उघड केले. याची आरटीओने गंभीर दखल घेत एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानकात एका गुरुवारी (ता. २६) पथकाद्वारे चौकशी केली. त्याचप्रमाणे विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून असा गंभीर प्रकार आढळल्यास बसगाड्यांचे फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्याचा इशाराही दिल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी दिली. 

एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे एसटी बसगाड्यांची दुरवस्था झाली आहे. शेकडो किलोमीटर प्रवास करणाऱ्या बसगाड्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पळविल्या जात आहेत. ॲक्‍सिलेटरची अत्यंत कमी दराची असलेली स्प्रिंग नसल्याने वाहनचालकांना ॲक्‍सिलेटरला रबर बांधून प्रवास करावा लागत आहे. अनेक बसगाड्यांचे पत्रे खिळखिळे झालेले आहेत. साईडग्लास खिळखिळे झालेले असल्याने पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचे पॅकिंग देऊन चालक शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत आपली ड्यूटी करीत आहेत. या सगळ्या धक्कादायक प्रकारावर ‘सकाळ’ने आपल्या बातम्यांतून प्रकाश टाकला. त्याची प्रादेशिक परिवहन अधिकारी सदामते यांनी तातडीने दखल घेतली. असुरक्षित बसचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्याचा आधिकार आरटीओ कार्यालयाला असल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी मोटार वाहन निरीक्षक यादव यांच्यासह पथकाने बसस्थानकात भेट देऊन काही बसची पाहणी करून सूचना केल्या. बहुतांश बस बाहेरगावी गेलेल्या असल्याने रबर लावलेली गाडी आढळली नाही; मात्र विभाग नियंत्रकांनी तातडीने विभागातील सर्व बसगाड्यांच्या फिटनेसची पाहणी करावी. तसेच ज्या बसची वाईट अवस्था आहे, त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, असे पत्र दिले आहे. आरटीओ कार्यालय लवकरच मोहीम हाती घेणार आहे, त्या वेळी दोषी बसचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल.

Web Title: RTO warns cancellation of fitness certificates