फुलंब्रीत 31 हजार 400 मुलांना गोवर, रूबेलाची लस

नवनाथ इधाटे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

फुलंब्री (औरंगाबाद) : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेला 27नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. 25 डिसेंबर पर्यंत फुलंब्री तालुक्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुमारे 31 हजार चारशे मुलांना मुलांना गोवर व रुबेलाची लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विलास विखे पाटील यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले.  

गोवर हा सर्वांना माहिती असलेला संसर्गजन्य आजार असून या रोगामुळे मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व येऊ शकते. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होण्याची शक्यता राहते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (एमएमआर) चा वापर केला जातो.

रुबेला लसीकरणाच्या एका इंजेक्शनमुळे भावी पिढी आपण वाचवू शकतो. लहान मुलांना होणारा गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. सरकारने 2020पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने संपूर्ण राज्यभर नऊ महिने ते 15 वर्ष वयोगटाच्या मुलांना लसीकरण दिले जात आहे. फुलंब्री तालुक्यात नऊ ते 15 वर्ष वयोगटाचे सुमारे 45 हजार 557 बालके आहेत. या सर्व बालकांना फुलंब्री तालुका आरोग्य विभागाच्या माध्यमातून लसीकरण दिले जात आहे. तालुक्यातील गणोरी, आळंद, वडोद बाजार, बाबरा, आणि जातेगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रावर तालुक्यातील बालकांना लसीकरण देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. येत्या 30 डिसेंबर पर्यंत तालुक्यातील सुमारे 45 हजार बालकांना नऊ महिने ते 15 वर्ष वयोगटाच्या मुलांना लसीकरण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका - डॉ. विखे पाटील 
तालुक्यातील नऊ महिने ते 15 वर्ष वयोगटाच्या मुलांना गोवर व रुबेला लसीकरण दिले जात आहे. काही लोकांनी लसीकरणासंदर्भात चुकीची अफवा पसरवली आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस अत्यंत महत्वाची असल्याने सर्वांना कोणत्याही चुकीच्या अफवेवर विश्वास न ठेवता आपल्या मुलांना लस विनामुल्य टोचून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विलास विखे पाटील यांनी केले.

Web Title: rubella gowar vaccination to 31 thousand 400 students in fulambri