सिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा भोगल्याशिवाय जाताच येत नाही, अशी व्यवस्था शहरात आहे. 

औरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा भोगल्याशिवाय जाताच येत नाही, अशी व्यवस्था शहरात आहे. 

शहरात वाहनांची भरमसाट संख्या असली तरीही नियम पाळणाऱ्यांची संख्या मात्र अत्यंत तोकडी आहे. शहर वाहतूक शाखा मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक शाखेकडून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मात्र व्यापक कारवाई होत नाही. त्यातच शहरातील सिग्नल व्यवस्था ही गर्दीच्या व कमी गर्दीच्या वेळांनुसार बदलत नाही. त्यामुळे ज्याला नियम पाळायचे आहेत, त्यांना सिग्नलवर १८० सेकंदांपर्यंत उभे राहावे लागत आहे. तर अनेक सिग्नलवर टाइमिंग अत्यंत कमी असल्याने, सिग्नल सुटल्यानंतरही तीन-तीन वेळा थांबावे लागत आहे. 

काय आहे अडचण?
वाहतूक सिग्नलवर कॉम्प्युटराईज्ड पद्धतीने सिग्नल टाइमिंग सेट केले जातात. तीस सेकंद ते १८० सेकंदांपर्यंतच्या सायकलनुसार (चक्रानुक्रम) सिग्नल्सची व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी अधिक गर्दी असते, त्या सिग्नलच्या वेळा वाढवल्या जातात. ज्या ठिकाणी कमी गर्दी आहे, अशा ठिकाणच्या सिग्नलवर वेळा कमी केल्या जातात. मात्र हे फिक्‍स पद्धतीने होते. त्यामुळे अचानक गर्दी कमी अथवा जास्त झाली तर या टाइमिंग पद्धतीचा उपयोग होत नाही. 

काय केले पाहिजे? 
सिग्नलवर गर्दी वाढली अथवा कमी झाली तर तत्काळ रिमोट पद्धतीने सिग्नल्सची वेळ कमी किंवा जास्त केली पाहिजे. मुंबई, पुणे व अन्य काही शहरांमध्ये ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे.

Web Title: Rule holders 180 seconds punishment in aurangabad

टॅग्स