पीरबावडा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

बाबासाहेब ठाेंबरे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पीरबावडा (ता. फुलंब्री) परिसरात मारसावळी, गिरसावळी, रांजणगाव, बाभूळगाव आदी गावांत समाधानकारक पाऊस न झाल्याने मका, कपाशी आदी पिके सुकत चालली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके हातून जाण्याच्या मार्गावर आहेत.

पीरबावडा, ता. 19 (जि.औरंगाबाद ): पीरबावडा (ता. फुलंब्री) परिसरात मारसावळी, गिरसावळी, रांजणगाव, बाभूळगाव आदी गावांत समाधानकारक पाऊस न झाल्याने मका, कपाशी आदी पिके सुकत चालली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके हातून जाण्याच्या मार्गावर आहेत.

अजून नदी, नाले, विहिरी, तलाव कोरडेच असल्याने परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही विहिरींना काही प्रमाणात पाणी आले, मात्र, हे पाणी साचलेले असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करीत भटकंती करावी लागते.

तसेच, मारसावळी गावातही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने महिलांसह चिमुकल्यांना आपला जीव धोक्‍यात घालून विहिरीतून पाणी काढून आणावे लागत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर शाळा, महिलांना शेतकाम असल्यामुळे लहान मुलांना नाईलाजाने दूरवरून पाणी आणावे लागते. तरी, परिसरात लवकर टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Run For Water In Pirbawada Area