औरंगाबाद वाळुज रस्त्यावर धावत्या कारने घेतला पेट

मनोज साखरे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

धावत्या कारच्या बोनट मधून अचानक धूर येत असल्याची बाब अन्य एका वाहन चालकाच्या लक्षात आली.

औरंगाबाद - औरंगाबाद वाळूज रस्त्यावरील छावणी येथे लोखंडीपुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतला. हि घटना दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी घडली. वेळीच हि बाब लक्षात आल्याने कारमधील तिघे बालबाल बचावले. यात काही माध्यमकर्मी असल्याची माहिती समोर आली आहे. असे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.

वाळूज येथून तिघेजण औरंगाबादेत कारने येत होते. यात काही माध्यमकर्मींचा समावेश होता. त्यांच्या धावत्या कारच्या बोनट मधून अचानक धूर येत असल्याची बाब अन्य एका वाहन चालकाच्या लक्षात आली. त्या चालकाने हि बाब  कारचालकाला सांगितली. लोखंडी  पुलावर कार थांबवून तिघे कारमधून उतरताच कारने अचानक पेट घेतला, त्यामुळे तिघे बचावले. या घटनेची अग्नीशामक दलाला माहिती समजताच एक बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारची आग विझवली. कार पूर्णतः जळाली असून सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The running car was set on fire in aurangabad