सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त ; एक जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्यांच्या पथकासह गोलपांगरी येथे सापळा लावून अंबड येथून जालना शहरात दाखल होणाऱ्या सहा लाख 17 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

जालना : जालना तालुक्यातील गोलपांगरी येथे विशेष कृती दलाने मंगळवारी (ता.24) दुपारी सापळा लावून 100 रूपयांच्या  तब्बल सहा लाख 17 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबड येथून जालना शहरात बनावट नोटा येणार असल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्यांच्या पथकासह गोलपांगरी येथे सापळा लावून अंबड येथून जालना शहरात दाखल होणाऱ्या सहा लाख 17 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या सर्व नोटा 100 रूपयांच्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. दरम्यान, बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: Rupees 6 lakh currency notes have been seized one man arrested

टॅग्स