ग्रामीण भागात स्कूलबस विरोधात जूनपासून मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पोलिसांनी घेतली बैठक; नियमांचे पालन करण्याच्या संस्थाचालकांना सूचना

औरंगाबाद - स्कूलबसची नियमावली तंतोतंत पाळण्याची भूमिका ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. यासाठी बोलावलेल्या बैठकीत संस्थाचालकांना नियमावलीची जाणीव करून देण्यात आली. स्कूलबस नियमांची पायमल्ली करणाऱ्या शाळा व संस्थांच्या विरोधात १ जूनपासून कारवाई करण्यात येणार आहे.  

स्कूलबससाठी असलेल्या नियमांचे पालन केले जात नाही, विशेषतः ग्रामीण भागात सर्रास नियमाची पायमल्ली करून स्कूलबस चालवल्या जातात. मुलांची व मुलींची स्कूलबसद्वारे केली जाणारी वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. म्हणूनच ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली.

बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. स्कूलबस नियमावलीकडे ग्रामीण भागात दुर्लक्ष केले जाते; मात्र हा दुर्लक्ष करण्याचा विषय नसल्याने यापुढे थेट कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. शासनाने २२ मार्च २०११ रोजी स्कूलबससाठी नियमावली करून परिपत्रक काढलेले आहे. त्यातील नियमांचे पालन करण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या.

असे आहेत नियम
शालेय स्तरावर समिती गठित करणे आवश्‍यक. 
लहान मुलांना अगोदर व मोठ्या मुलांना नंतर सोडावे.
बसचालकाला व्यसन असू नये.
चालकाकडे वैध वाहन परवाना व किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्‍यक.
मुलींसाठी बसमध्ये महिला प्रतिनिधी आवश्‍यक. 
बसमध्ये मुलांना आसन व्यवस्थेप्रमाणे बसवले पाहिजे.
आपत्कालीन दरवाजा असला पाहिजे. 
प्रत्येक बसने आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक.
बसला स्पीड गव्हर्नर बसवणे आवश्‍यक आहे. 
तीन महिन्यांनी शालेय शिक्षण समितीची बैठक आवश्‍यक.

Web Title: rural area school bus oppose campain in june