ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

ग्रामीण भागातील सर्वच पालकांचा शहरी शाळांकडे कल

गेल्या काही वर्षांत शासनाने शाळांची जणू काही खैरातच वाटली हाेती. त्यामुळे दाेन छाेट्या गावाआड माध्यमिक शाळा झालेली आहे. शाळा भरपूर प्रमाणात वाढल्या असल्या तरी ग्रामीण भागातील लाेकसंख्या त्या तुलनेत अजूनही स्थिरच आहेत.

नांदेड : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्यांवर फिरून विद्यार्थ्यांची शाेधमाेहीम सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच शाळा या माोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील पालकांचा आपल्या पाल्यांना शहरातील नामांकित असलेल्याच शाळांमध्ये दाखल करण्याकडे अधिक कल दिसत असल्यामुळे व कधी काळी नामवंत व गुणवान उच्चपदस्थ विद्यार्थी घडविणाऱ्याच ग्रामीण भागातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत ग्रामीण भागात गाव तेथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने पालकांची एक प्रकारे माेठी साेयच यानिमित्ताने झालेली आहे.

गेल्या काही वर्षांत शासनाने शाळांची जणू काही खैरातच वाटली हाेती. त्यामुळे दाेन छाेट्या गावाआड माध्यमिक शाळा झालेली आहे. शाळा भरपूर प्रमाणात वाढल्या असल्या तरी ग्रामीण भागातील लाेकसंख्या त्या तुलनेत अजूनही स्थिरच आहेत. त्यातच ग्रामीण भागातील पालक हा आपल्या पाल्यांना घेवून शहरी शाळांकडे वळलेला आहे, तर आपल्या मुलांनाही शहरातील मुलांप्रमाणे इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे, या शिक्षणाच्या धावत्या युगात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत असाायला पाहिजे म्हणून ग्रामीण भागातील पालक हा दिवसरात्र मेहनत करून आपल्या पाेटाला चिमटा मारून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पै-पै जमवत आहेत, तर बहुतांश पालक हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव, घरदार साेडून मुले ज्या शहरात शिक्षण घेत आहेत, त्याच शहरात राहून माेलजमुरी करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही डिजिटल हाेण्याकडे कल असतानाही अनेक शाळांना विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे ग्रामीम भागात विद्यार्थ्यांना शाेधण्यासाठी शिक्षकांना वणवण फिरावे लागत आहे.

अशातच शहरी भागातील शिक्षकही आता ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्यांवर विद्यार्थ्यांचा शाेध घेत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये पटसंख्या ही कागदाेपत्रीच दाखवली जाते. पटसंख्या माेजण्यासाठी अधिकारी आल्यास अर्थपूर्ण व्यवहार केला जात आहे. यातूनच जास्तीची विद्यार्थी संख्या दाखविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्याने ग्रामीण भागातील मराठी व जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आतापासूनच पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
वाढत्या स्पर्धेला ताेंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांना विद्यार्थी शाेध घेण्यासाठी गावाेगावी पाठविल्याचे दिसत आहे, तर विद्यार्थ्याला घरापासून ते शाळेपर्यंत ने-आण करण्याची व्यवस्थाही शाळेकडूनच करण्यात आली असल्याची माेठी बतावणी सर्वच शाळांकडून करण्यात येत आहे, तर आपल्या पाल्यांनाही शहरातील इंग्रजी शाळेत शिकायला मिळत आहे, त्यामुळे पालकही माेठ्या खुशीने तयार हाेत आहेत. काही दिवसांपूर्वीच सर्वच शाळांचे निकाल लागल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शिक्षक हा पालकांना भेटून टीसी मिळविण्याचा शर्तीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, तर यात सर्वात माेठे आव्हान अनुदानीत शाळांमधील शिक्षकांसमाेर उभे टाकले आहे.

विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकडीची मान्यता रद्द हाेण्याची भीती असते. परिणामी, काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा माेठा धाेका हा या शिक्षकांवर ओढावू शकताे. एकेकाळी शिक्षकाला संपूर्ण गाव आदर्श मानून त्यांना माेठा सन्मान देत हाेते. पण काळाच्या ओघात नाेकरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शाेधात दाराेदार फिरण्याची वेळ आता याच शिक्षकांवर आली आहे. दरम्यान, ही परिस्थिती पाहता ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा सुरू झाल्याने ज्या पालकांना इच्छा असूनही आपल्या पाल्यांना शहरातील नामवंत व महागड्या शाळांमध्ये दाखल करणेच उचित समजत आहेत, तर ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असे पालक मात्र, ग्रामीण भागातीलच शाळेत पाल्यांना ठेवण्यासाठी आग्रही आहेत. पण येथील शाळांना हे विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे या शाळांचेच आता अस्तित्व धाेक्यात आलेले आहे.

शिक्षकांवर आली आत्मपरीक्षणाची वेळ
ग्रामीण भागातील शिक्षकांच्या शिकवणीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळेच ग्रामीण भागातील पालक हा आपल्या पाल्यांना शहरातील शाळांमध्ये दाखल करतात. वास्तविक शहरात किंवा ग्रामीण भागात सारख्याच पदवीचे शिक्षक कार्यरत असताना असे असतानाही शहरातील शाळांकडे पालकांचा कल वाढल्याने ग्रामीण भागातील शिक्षकांनी आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे हाेवून बसले आहे.

पालकांनी सजग हाेण्याची गरज
ग्रामीण भागातील पालक हा आपल्या पाल्यांना गावातील शाळेत शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी पाठवून देत असताे. पण शाळेत आपल्या पाल्यांना काय शिकविले, काेणत्या शिक्षकाने शिकविले, काेणते शिक्षक गैरहजर हाेते, शाळेत आलेले शिक्षक किती वाजता आले व घरी किती वाजता परत जात आहेत, शाळेतील शिक्षकांना ठरवून दिलेला अभ्यासक्रम हा पूर्ण झालेला आहे की नाही, या सर्व गाेष्टी पालकांनी पाहिल्या तरच आपल्या पाल्याची प्रगती हाेवून शाळेचे अस्तित्व अबाधित राहील, अन्यथा नाही. त्यासाठी मात्र, पालक हा सजग असला पाहिजे.

Web Title: rural schools in danger due to spread of urban schools