जालना : ग्रामीण नळ योजनांकडे थकले ३१ कोटींचे बिल

जिल्ह्यात २३५ योजनांची वीज जोडणी कायमस्वरूपी बंद
water supply
water supply

जालना : जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र, जिल्ह्यातील एक हजार १८ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे तब्बल ३० कोटी ९५ लाख ३२ हजार रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर २३५ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी बंद झाले आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यांत अनेक पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात दर वर्षी उन्हाळ्यांमध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. परंतु, यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. सार्वजनिक विहिरींसह तलावाचे पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत आणण्याचे काम ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत केले जाते. मात्र, जिल्ह्यातील एक हजार १८ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे तब्बल ३० कोटी ९५ लाख ३२ हजारांचे वीजबिल थकीत आहे.

यामध्ये महावितरणच्या बदनापूर ग्रामीण एक व दोन उपविभागातील २२४, भोकरदन ग्रामीण उपविभागातील १९८, घनसावंगी उपविभागातील ९०,जाफराबाद ग्रामीण उपविभागातील १३०, जालना ग्रामीण उपविभागातील १९७, मंठा उपविभागातील १०८ तर परतूर ग्रामीण उपविभागातील ७१ असे एकूण एक हजार १८ ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकडे तब्बल ३० कोटी ९५ लाख ३२ हजारांची थकबाकी आहे.

तर महावितरणच्या बदनापूर ग्रामीण एक व दोन उपविभागातील ४६, भोकरदन ग्रामीण उपविभागातील ५९, घनसावंगी उपविभागातील २१,जाफराबाद ग्रामीण उपविभागातील ५, जालना ग्रामीण उपविभागातील ८१, मंठा ग्रामीण उपविभागातील ७ तर परतूर ग्रामीण उपविभागातील १६ असे एकूण २३५ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे एक कोटी ८९ लाख १२ हजारांचे वीजबिल थकीत असून हे कनेक्शन कायम स्वरूपी बंद केले आहे. ग्रामीण पाणी पुरवठ्यांचे कोट्यवधींचे वीजबिल थकीत असल्याने भर उन्हाळ्यांत महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीजबिल न भरल्याने पाणी असून ही अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसण्याच्या मार्गावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com