नांदेड - प्रतिपंढरपूर ब्रम्हपुरीत दर्शनासाठी गर्दी

प्रमोद चौधरी
सोमवार, 23 जुलै 2018

नांदेड : मोठ्या पंढरपूर इतकेच महत्वाचे असलेल्या ब्रम्हपुरीतील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भाविकांनी आषाढीनिमित्त सोमवारी (ता.23) दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे पाच वाजेपासुनच शहरासह परिसरातील दिंड्याही विठ्ठल नामाच्या गजरात व टाळ  मृदंगाच्या तालावर पावली खेळत दाखल होत आहेत.

नांदेडमधील तारातीर्थ (आताचा मार्कंडेय) घाटावर सर्वात जुने विठ्ठल रूक्मिणीचे जुने मंदिर आहे. प्रतिपंढरपुर अशी मान्यता असल्याने मोठ्या पंढरपुरप्रमाणेच आषाढीचा उत्सव येथे साजरा होतो. पवित्र गोदावरी नदिच्या काठावर हे मंदिर असल्याने विशेष महत्त्व आहे. शिवाय जुने हनुमान मंदिर, कृष्ण तसेच गणेश मंदिर आहे. संगत साहिब गुरूद्वाराही आहे. 

Web Title: rush at pratipandharpur in bramhapuri for ashadhi at nanded

टॅग्स