सचिन वाघ आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी (ता. 10) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सचिनचा बुधवारी (ता. 11) मृत्यू झाला.

औरंगाबाद : महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर सचिन वाघ (वय 19) या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी महाविद्यालायच्या जबाबदार व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंदवावा अशा मागणीसाठी एमआयटीचे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून सातारा पोलिस ठाण्यावर दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढला.  

एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी (ता. 10) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सचिनचा बुधवारी (ता. 11) मृत्यू झाला.

जमावाने पोलिस ठाण्यात जाऊन महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे ठाण्यात हजर झाले असून मृत सचिनच्या वडिलांसोबत चर्चा केली.

Web Title: sachin wagh suicide case in Aurangabad