औरंगाबाद : तीन वर्षांत उभारणार सफारी पार्क 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सुधारणा व सफारी पार्कचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी हमी आयुक्तांनी दिल्ली येथे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासमोर दिली आहे. प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केल्याच्या अपिलावर शुक्रवारी (ता. 15) सुनावणी झाली. 

औरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सुधारणा व सफारी पार्कचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी हमी आयुक्तांनी दिल्ली येथे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासमोर दिली आहे. प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केल्याच्या अपिलावर शुक्रवारी (ता. 15) सुनावणी झाली. 

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने पिंजऱ्यांची मांडणी यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने 26 नोव्हेंबर 2018 ला सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. त्याविरोधात महापालिकेच्या शिष्टमंडळाने 12 डिसेंबरला केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे सचिव सी. के. मिश्रा यांची भेट घेऊन अपील दाखल केले.

मिश्रा यांनी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास स्थगिती देत असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी वन व पर्यावरण सचिव ए. के नाईक यांचीही भेट घेऊन निवेदन दिले. असे असतानाच शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण यांनी पर्यावरण सचिव मिश्रा यांच्यासमोर बाजू मांडली. सध्याचे प्राणिसंग्रहालय येत्या तीन ते चार वर्षांत सफारी पार्कचे काम पूर्ण करून तेथे हस्तांतरित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Safari Park set up in three years