चोरांच्या नजरेपासून 'अशी' वाचवा दुचाकी 

तुषार पाटील
सोमवार, 2 डिसेंबर 2019

भोकरदन - कधीकाळी चैनेची बाब मानली जाणारी दुचाकी आज जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र अलीकडेच दुचाकीचोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकही चिंतेत आहेत. घरासमोर उभी केलेली दुचाकी केवळ हलगर्जीपणामुळे रात्रीतून लंपास होत आहे. खरेतर जराशी खबरदारी घेतल्यास दुचाकीचोरीला आळा बसणे सहज शक्‍य आहे. 

  • काय करता येईल... 
  • - बाजारपेठेत नजरेच्या टप्प्यात उभी करावी दुचाकी 
  • - प्रत्येक वेळेस हॅंडल लॉक करणे गरजेचे 
  • - रात्री घरासमोर दुचाकी उभी केल्यास साखळी, कुलुपाचाही वापर 
  • - फ्युएल लॉक, साईड लॉकही ठरेल साहाय्यकारी 
  • - दुचाकीला जीपीएस सिस्टीम बसविणे 
  • - दुचाकीत असावे कामापुरते पेट्रोल 
  • - दुचाकीचा विमा असणे गरजेचे 
  • - टच सायरनमुळे रोखता येईल चोरी 

दुचाकीच्या हॉर्न, शोभेच्या वस्तूंवर खर्च केला जातो; मात्र दुचाकीला जीपीएस सिक्‍युरिटी सिस्टीम, हॅन्डल लॉक, इतर लॉक, इन्शुरन्स आदींच्या बाबतीत खर्च करण्यास अनेकजण टाळाटाळ करतात. या गोष्टीवर खर्च करणे अपेक्षित आहे. 
- योगेश इंगळे 
दुचाकी मेकॅनिक 

आज बाजारात जीपीएस सिक्‍युरिटी सिस्टीम अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत. कुठल्याही ऑटोमोबाईलच्या दुकानावर चौकशी केल्यास तसेच इंटरनेटवर यासंबंधात पूर्ण माहिती मिळते. अगदी प्रत्येकाने ही सिस्टीम आपल्या गाडीत जरूर बसवावी; जेणेकरून दुचाकीचोरीस आळा बसेल. 
- राजेंद्रसिंह गौर 
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा 

दुचाकीच्या सुरक्षेची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. दुचाकीचा अनेकजण विमा काढत नाहीत. खासकरून जुन्या दुचाकींचा. सध्या विमा कंपन्यांकडून तीन वर्षे व पाच वर्षे असे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. दुचाकीचा विमा असल्यास चोरी, अपघातासारख्या घटनेत आर्थिक आधार होतो. 
- प्रतीक देशमुख 
विमा सल्लागार तथा दुचाकी विक्रेते 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: safety of bike