शालेय मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य

फोटो
फोटो

नांदेड : जिल्ह्यात असलेल्या चार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील निवासी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी (ता. सहा) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालया योजनेचा आढावा जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, प्राथमीक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमीक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, बिलोली, उमरी, धर्माबाद व मुदखेडचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याद्यापक, पोलिस अधिकारी, प्राचार्या जयश्री आठवले, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, चार तालुक्यातील निराधार व दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुलींना शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निवासी शाळांमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण व निवासाची व्यवस्था देण्यात येते. या ठिकाणच्या विद्यालयात संध्याकाळी पाचनंतर मुलीच्या पालकांशिवाय इतरांना कोणत्याही पुरुषांना प्रवेश देण्यात येऊ नये, मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापिका, गृहप्रमुख व संपूर्ण कार्यालयीन कर्मचारी यांची राहील. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. प्रत्येक निवासी खोलीमध्ये लाईटची अद्यावत सुविधा उपलब्ध करून घ्यावी. रात्रीच्या वेळेस शाळेमध्ये कुठेही अंधार राहू नये, प्रत्येक मुलीला मी स्वतः सुरक्षित आहे असे आत्मविश्वासाने वाटणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगीतले. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशिक्षणे विद्यार्थिनींना देणे अत्यंत आवश्यकअसल्याचे त्यांनी निर्देशीत केले


निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगल्या प्रकारचा असावा. त्यासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती प्रचलित शासन नियमानुसार नियुक्ती करावी. शिक्षिकांच्या मानधनासाठीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा मानवविकास कार्यालयाकडे सादर करावे. तसेच विद्यार्थिनींचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरमहा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. मुदखेड येथील शाळेला मुख्य रस्त्यापासून शाळेपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग तातडीने तयार करण्याच्या सूचना संबंधित तहसीलदार यांना देण्यात आल्या. हे काम नगरपालिकेकडून करण्यात येईल असे मुदेखडचे तहसीलदार यांनी सांगितले.

सुरक्षा समितीची बैठक


कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांत दरतीन महिन्याला सुरक्षा समितीची बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सुरक्षा समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी राहतील. तर केंद्रप्रमुख, महिला अंगणवाडी परिवेक्षिका, परिचारिका, महिला पालक प्रतिनिधी असावेत तर मुख्याध्यापिका सदस्य सचिव राहतील अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

चार विद्यालयात ६१० विद्यार्थींनी


जिल्ह्यात मुदखेड, उमरी, धर्माबाद व बिलोली या चार ठिकाणी असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांत एकूण ६१० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या निवासी शाळांना चागंल्या इमारती उपलब्ध असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री दिग्रसकर यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com