पहा सहस्त्रकुंड धबधब्याचे आजचे रौद्ररूप (Video) 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी परतीच्या तुफान पावसाने दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्यानेही रौद्ररूप धारण केले आहे. त्याचे हे ओसंडून वाहणे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. 

सहस्त्रकुंड (जि. नांदेड) : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी परतीच्या तुफान पावसाने दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्यानेही रौद्ररूप धारण केले आहे. त्याचे हे ओसंडून वाहणे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. 

सततच्या पावसामुळे परिसरातील नदीनाले तुडुंब भरून वाहत असून, परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या नाकात दम भरला आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नद्यांना पूर येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि परिसरात पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला असून, तो न चुकता रोज हजेरी लावत आहे. या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्यही फुलून आले आहे. "सहस्रकुंड'च्या तिनही धारा आपल्या सहस्त्रधारांनी वाहत आहेत. 

Nanded Sahasrakund Waterfall

काही दिवसांपूर्वी पावसाला खंड मिळाला होता. तसेच उष्णतेचा पाराही वाढल्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्याच्या सहस्त्रधाराही बंद पडल्या होत्या. आता काही दिवसांपासून परतीच्या पावसाने परिसरात मुक्कामच ठोकला आहे. परिणामी नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्यासोबत सहस्त्रकुंड धबधबाही आपल्या रौद्ररूप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपासून हे पर्यटक स्थळ पर्यटकांविना सुनेसुने झाले होते. आता सहस्त्रकुंडचे सौंदर्य पुन्हा फुलून आल्याने पर्यटकांचे लोंढे वाढत असल्याचे दिसत आहे. 

Nanded Sahasrakund Waterfall

हैदराबादचे चौघे बुडाले होते 

मुरली येथील धरणाचे पाणी सोडल्यामुळे या धबधब्याला गेल्या महिन्यात अचानक पाणी आले होते. यावेळी बाहेर पडण्याची उसंत न मिळालेले हैदराबादेतील तीन तरुण बुडाले होते. 15 ऑक्‍टोबरला ही दुर्घटना झाली. नेमके त्या दिवशी सहस्रकुंड धबधब्याला पाणी नव्हते. त्यामुळे चार विद्यार्थी धबधब्याच्या खोलगट गाभाऱ्यात उतरले. तेथे दगडावर कडेला थांबून सेल्फी काढत असतानाच मुरली धरणातून पाणी सोडल्यामुळे या विद्यार्थ्यांना बाहेर पडताच आले नाही. अचानक आलेल्या लोंढ्यात चौघेही वाहून गेले. कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन भोंगा वाजविला होता; पण त्याचा उपयोग झाला नाही. स्थानिकांनी त्याच दिवशी एकाला वाचविले. तिघांचा शोध सुरू होता. अखेर 48 तासांनंतर त्यांचे मृतदेह सापडले. 

हेही वाचा -

हिंगोलीत वाघाने फोडला तरुणाचा खांदा

पावसामुळे रस्त्यातच रुतली एसटी (Video)

मह्या पोरांवर मेंढ्या चारायची येळ नको

आता तर 'या' गावातही झाली अतिवृष्टी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahasrakund Waterfall in Nanded attracting Tourists