साहित्य संमेलन मराठवाड्यात झाले पाहिजे - सबनीस 

सुशांत सांगवे 
बुधवार, 11 एप्रिल 2018

लातूर - ""आपला "राजा' उदार झाला, तो केवळ 25 लाख रुपयांनी. त्यामुळे साहित्य संमेलनाचे अनुदान 50 लाख रुपयांपर्यंत पोचले आहे; पण एवढ्याशा रकमेत साहित्य संमेलन होत नाही. हा निधी सरकारने आणखी वाढवावा आणि साहित्य महामंडळाने आगामी संमेलन स्वबळावर मराठवाड्यात घ्यावे. मराठवाड्याचा "बॅकलॉग' भरून काढणे ही सांस्कृतिक गरज आहे,'' असे स्पष्ट मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. फुटीर प्रवृत्तीने वेगळा मराठवाडा काढण्यापेक्षा "आपण एक आहोत' ही जाणीव उर्वरित महाराष्ट्राने करून देणे, या दृष्टिकोनातूनही मराठवाड्याच्या मातीत संमेलन होणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 91 वर्षांच्या इतिहासात केवळ सात संमेलने मराठवाड्यात झाली आहेत. तर 2004 मध्ये प्रा. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या भागात शेवटचे संमेलन झाले. त्यानंतर गेल्या चौदा वर्षांत या भागात एकही संमेलन झाले नाही. या तुलनेने पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भात झालेल्या संमेलनांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. सबनीस यांनी "आगामी संमेलन मराठवड्यातच व्हावे', अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमानिमित्त ते लातूरमध्ये आले होते. या वेळी "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. 

... तर मराठीला गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही! 
कर्नाटक सरकार कन्नड साहित्य संमेलनासाठी आठ कोटी रुपयांचा निधी देते. संमेलनासाठी केवळ 50 लाख रुपये देणे, ही मराठी भाषेची उंची आहे का? कर्नाटकसारखा निर्णय आपल्याकडे झाला तर साहित्य महामंडळाला स्वबळावर साहित्य संमेलन घेता येऊ शकेल. आयोजक, प्रायोजकांची गरजच भासणार नाही. तंबाखूवाले, गुटखावाले, साबणवाले, व्यापारी यांच्याकडे मराठी गहाण ठेवून मराठीच्या कैवाऱ्यांना त्यांच्याकडे हात पसरविण्याची वेळही येणार नाही, असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.

Web Title: Sahitya Sammelan should be held in Marathwada - Sabnis