'साई अभियांत्रिकी'चे परीक्षा केंद्र रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद - चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्र विद्यापीठाने रद्द केले आहे. महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याची शिफारस करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी. एम. नेटके यांनी बुधवारी (ता. 17) पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा 2 मेपासून सुरू आहेत. या परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी सकाळी समजली. या संदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तत्काळ कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे व डॉ. नेटके यांना या केंद्रावर पाठविले. साई अभियांत्रिकी केंद्रावर या दोघांनी भेट दिली असता, "गोपनीय कक्षातून' सील तोडून उत्तरपत्रिकांचे दोन गठ्ठे गायब असल्याचा प्रकार निदर्शनास आला.

Web Title: sai engineering exam center cancel