साईबाबांचे जन्मस्थान पाथरीच, आता मोठे आंदोलन

Beed News
Beed News

माजलगाव (जि. बीड) : शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थान हे परभणी जिल्ह्यातले पाथरी गावच आहे. याबाबतचे विविध पुरावेदेखील मिळाले आहेत. तरीही याबाबतचा वाद निर्माण करण्यात आला आहे, असा दावा माजलगाव येथील भक्तांनी केला आहे. 

पाथरीला साईबाबांच्या जन्मस्थळाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी जलतरण मित्र मंडळाच्या वतीने आंदोलनही उभारण्यात येणार आहे. गुरूवारी (ता. 20) राष्ट्रीय महामार्गावर परभणी फाटा येथे 'साईबाबा जन्मस्थान, पाथरी' असा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे.

साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असतांनाही यावर वाद निर्माण केला जात आहे. शासनाने जन्मस्थळासाठी मोठा निधी दिला असल्याने वाद घालुन हा निधी वळविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत, माजलगाव येथील जलतरण मित्र मंडळाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

साईबाबांचे गुरूस्थान सेलू येथे आहे. विविध ग्रंथांमध्ये व राजपत्रातदेखील याबाबतच्या नोंदी असल्याचे जलतरण मित्र मंडळाचे अध्यक्ष जीवन जगताप यांनी सांगितले. नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजेभाऊ शेळके यांनी सांगितले, की साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असतांना विनाकारण साई भक्तांच्या भावना दुखाण्याचे काम होत आहे.

याबाबत संपूर्ण मराठवाडाभर आंदोलन उभरण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणुन आज परभणी फाटा येथे दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. यावेळी मच्छिंद्र काळे, नारायण ताकट, तुकाराम येवले, संपत हराळ, सुरेश सोळंके, अंकुश शिंदे, संतोष मोगरकर, बाळु हारताळ, गणेश तौर, बाबा देशमाने यांचेसह मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com