साईबाबा घाटीला पावले! ; शिर्डी संस्थानाकडून 15 कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) गरजांकडे शासनाचे दुर्लक्ष असताना घाटीला साईबाबा पावले आहेत. शिर्डी संस्थानाने घाटीच्या खात्यावर पंधरा कोटींचा निधी 3 जुलैला वर्ग केला. या निधीतून क्ष-किरण विभागात अत्याधुनिक थ्री टेसला यंत्राच्या खरेदीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, प्रशासकीय मान्यता मिळताच खरेदी प्रक्रियेला सुरवात होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. 

पाच फेब्रुवारीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. येळीकर व क्ष-किरण विभागप्रमुख वर्षा रोटे कागिनाळकर यांनी घाटीतील कालबाह्य सीटी स्कॅन व एमआरआयच्या कायम नादुरुस्तीमुळे नव्या यंत्रांची गरज निदर्शनास आणून दिली होती. दोन्ही मंत्र्यांनी पुढाकार घेत घाटीला डीपीसीतून सात कोटींचे सीटी स्कॅन, तर श्री शिर्डी संस्थानकडून निधी मिळवून देण्यासाठी शब्द दिला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दोन दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. यंत्रसामग्री विभाग, डॉ. येळीकर, डॉ. रोटे यांच्या पाठपुराव्यामुळे घाटीला पाच फेब्रुवारी ते तीन जुलैदरम्यान पाच महिन्यांत 22 कोटींचा निधी खेचून आणण्यात यश मिळाले आहे. निधी मिळाल्याचे शासनाला कळवले असून, प्रशासकीय मान्यतेनंतर तो डीएमईआरच्या सूचनेनुसार खरेदीसाठी वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश देहाडे म्हणाले. 

अत्याधुनिक तंत्रज्ञान 

थ्री टेसला एमआरआय स्कॅनिंग यंत्र सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. शहरात उपलब्ध नसलेल्या व मुंबई-पुण्यात होणाऱ्या महागड्या चाचण्या घाटीत उपलब्ध होईल. या यंत्रासोबत सर्व डेडिकेटेड कॉइल्स, फंक्‍शनल इमेजिंग, एमआरआय गाइडेड ब्रेस्ट बायोप्सी, गुडघ्यांचा कर्टिलेज इमेजिंग तपासण्यांचा पूर्ण संच, सहा वर्षांचे सर्वप्रकारची देखभाल दुरुस्ती या प्रस्तावित असल्याने विनाखंडित तपासण्यांची सेवा देणे नव्या एमआरआयमुळे शक्‍य होणार आहे. शहरात असे दोनच एमआरआय आहेत. त्यापेक्षाही ऍडव्हान्स तंत्रज्ञान या यंत्रात असेल अशी माहिती डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी दिली. 

Web Title: Saibaba Blessing to Ghati 15 crore from Shirdi organization