सैराट स्टाईलमध्ये खून झालेल्या मुलाची 'ही' आहे ओळख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने भररस्त्यात खून केल्याची घटना घडली. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. या तरूणाचे नाव सुमित वाघमारे असे आहे. त्याला गिटार वाजवण्याची आवड होती. 

बीड : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने भररस्त्यात खून केल्याची घटना घडली. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. या तरूणाचे नाव सुमित वाघमारे असे आहे. त्याला गिटार वाजवण्याची आवड होती. 

सुमित इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीड येथे शिक्षण घेत होता. ज्या मुलीसोबत त्याचे प्रेम होते ती मुलगीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. सुमित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता. 

दीड महिन्यापूर्वी त्या दोघांनी न्यायालयात लग्न केले होते. लग्नानंतर सुमितच्या घरच्यांनाही त्रास देण्यात आला. हत्येच्या दिवशी त्याच्या पत्नीची परिक्षा होती. तिचा पेपर झाल्यानंतर तिला आणण्यासाठी सुमित कॉलेजला गेला असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळी त्याची पत्नीही सोबत होती. सुमित पूर्वी मामाकडे रहायचा, परंतु लग्न केल्यानंतर ते भाड्याची रुम घेऊन सोबत राहत होते. सुमित माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील रहिवाशी आहे. मुलगी बीड येथील रहिवाशी होती. मुलगी श्रीमंत असून सुमितची आर्थिक परिस्थिती डबघाईची होती.

Web Title: Sairat style murder in beed