बीडमधील 'सैराट' घटनेची पहा व्हिडिओ स्टोरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेची पूर्ण व्हिडिओ स्टोरी साम टीव्हीेने केली आहे.

बीड : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेची पूर्ण व्हिडिओ स्टोरी साम टीव्हीेने केली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच सुमितचा वर्गातल्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. हा विवाह मुलीच्या भावाला पसंत नव्हता. त्यामुळे मुलीच्या भावाने मित्रांच्या साथीने सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली. मुलीचा भाऊ बालाजी लांडगे हा फरार आहे. प्रेमप्रकरणातून बहिणीसोबत लग्न केल्याने संतापलेल्या भावाने मित्राच्या साहाय्याने मेहुण्याचा बहिणीसमोर चाकूचे वार करून खून केला. ही घटना बुधवारी (ता. 19) सायंकाळी सहा वाजता तेलगाव नाका परिसरात घडली. सुमित शिवाजी वाघमारे (वय 25, रा. तालखेड, ता. माजलगाव, सध्या मुक्काम नागोबा गल्ली, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  

Web Title: Sairat Style Murder In Beed vedio Story