‘सकाळ’च्या वर्धापनदिनी मंदार आपटेंची सुरेल मैफल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

खुले नाट्यगृहात गुरुवार, ५ एप्रिल रोजी आयोजन

अकोला : चोखंदळ वाचकांची पहिली पसंत असलेल्या ‘सकाळ’च्या वऱ्हाड आवृत्तीला बघता-बघता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येत्या गुरुवारी, ५ एप्रिल रोजी वऱ्हाड आवृत्तीचा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा होत आहे. नेहमीच वाचकांशी ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न असतो. दुसऱ्या वर्धापनदिनी अकोल्यात वाचकांसाठी ‘ती सध्या काय करते’ फेम मंदार आपटे यांच्या सुरेल मैफलीच्या माध्यमातून बहारदार मनोरंजनाची मेजवानी राहणार आहे.

अकोल्यातील खुले नाट्यगृहात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. सुमारे तीन तास चालणारा हा कार्यक्रम श्रोत्यांना वेगळी अनुभूती देऊन जाईल यात शंका नाही. आपल्या कर्तृत्वाने यशोशिखर गाठणाऱ्या विविध क्षेत्रातील नामवंतांच्या हृद्य सत्काराचे आयोजनही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले आहे.

सकाळ माध्यम समूहाचे प्रत्येक पाऊल हे समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठीच राहिले आहे. सकारात्मक, विकासात्मक आणि प्रभावी वार्तांकनाला ‘सकाळ’ने नेहमीच पसंती दिली आहे. विविध सामाजिक उपक्रमांसह अकोल्याला वैभवशाली शहर घडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला सुजाण वाचकांची चांगलीच पसंती मिळते आहे. शिवाय वऱ्हाडातील अनेक शहरे व गावांच्या विकासावरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्याला वाचकांचे पाठबळही लाभते आहे.

दिनांक : गुरुवार, ५ एप्रिल २०१८
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, अकोला
वेळ : सायंकाळी ठीक ६ वाजता.

Web Title: sakal anniversary and mandar aapte