"सकाळ ऑटो एक्‍स्पो'ची शहरवासीयांना पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

औरंगाबाद: "सकाळ'तर्फे 15 ते 18 डिसेंबरदरम्यान ऑटो एक्‍स्पो प्रदर्शन भरवण्यात येत आहे. विविध दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीबरोबरच विविध बक्षिसे आणि ऑफरची पर्वणी यानिमित्ताने शहरवासीयांना मिळेल.

औरंगाबाद: "सकाळ'तर्फे 15 ते 18 डिसेंबरदरम्यान ऑटो एक्‍स्पो प्रदर्शन भरवण्यात येत आहे. विविध दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीबरोबरच विविध बक्षिसे आणि ऑफरची पर्वणी यानिमित्ताने शहरवासीयांना मिळेल.

"सकाळ' व चेंबर ऑफ ऑथराईज्ड ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे चारदिवसीय प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात तीस दुचाकी व चारचाकी कंपनी आणि शोरूमचा सहभाग असणार आहे. तापडिया कासलीवाल मैदान (अदालत रोड) येथे भरणाऱ्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी (ता. 15) शहरातून भव्य वाहन रॅली काढण्यात येणार आहे. प्रदर्शनात विविध कंपन्यांतर्फे आकर्षक ऑफर आणि विविध स्कीम दिल्या जाणार आहेत. दररोज प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून "हमर कार'चे स्केल मॉडेल जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी 9850049455, 8793123555 यावर संपर्क साधावा, तसेच प्रदर्शनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: sakal auto expo